*अक्कलकुवा तालुक्यातील आज सार्वजनिक खाजगी व एक गाव एक गणपती एकूण 29 श्री विसर्जन शांततेत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुक्यातील आज सार्वजनिक खाजगी व एक गाव एक गणपती एकूण 29 श्री विसर्जन शांततेत*
*अक्कलकुवा तालुक्यातील आज सार्वजनिक खाजगी व एक गाव एक गणपती एकूण 29 श्री विसर्जन शांततेत*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील आज सार्वजनिक खाजगी व एक गाव एक गणपती असे एकूण 29 श्री विसर्जन शांततेत पार पाडण्यात आले विशेष म्हणजे वाण्याविहीर येथील पाच श्रींचे विसर्जन विनापोलीस बंदोबस्तात उत्साहात पार पाडण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सार्वजनिक सात गणेश मंडळ खाजगी सहा व एक गाव एक गणपती सोळा अशा एकूण 29 श्रींचे विसर्जन शांततेत पार पडले विशेष म्हणजे वाण्याविहीर येथील पाच श्रींचे विना पोलीस बंदोबस्तात विसर्जन शांततेत पार पडले वाण्या विहीर येथे पाच श्रींचे विसर्जन सालाबादप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आले येथील श्रींचे विसर्जन ढोल ताशांच्या निनादात नृत्य करीत उत्साहात पाच श्रींचे विसर्जन करण्यात आले यावेळी कुठलाही पोलीस बंदोबस्त मंडळांकडून मागविण्यात आला नव्हता अतिशय उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात येथील श्रींचे विसर्जन करण्यात आले गेली अनेक वर्षांपासून येथील श्रींचे विसर्जन उत्साहात शांततेत पार पडते, दरवर्षी अत्यल्प असा पोलीस बंदोबस्त पहिला घेतो मात्र यावर्षी विसर्जन मिरवणुकी दरम्यान विना पोलीस बंदोबस्त येथील श्रींची विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पडली येथील श्रींचे विसर्जन हे राज्यासाठी आदर्श विसर्जन मिरवणूक ठरली आहे या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी व जितेंद्र पाडवी यांनी केले. यावेळी अशोक पाडवी, कथ्थुराम सैंदाणे, कांतीलाल पाडवी आदिंसह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.