*वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिवस व एक दिवसीय आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिवस व एक दिवसीय आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिवस व एक दिवसीय आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिमखाना विभागाकडून आयोजित हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संजय जाधव हे उपस्थित होते. तर सौ. वर्षा जाधव सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव व कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा डॉ.हिमांशू जाधव, नागरी संरक्षण विभाग प्रशिक्षणाधिकारी रामसिंग बागुल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. राठोड, क्रीडा संचालक आर.आर. सोनवणे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ बी. वाय. बागुल. हे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मेजर ध्यानचंद आणि प्रेमचंद जाधव यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस व आपात्कालीन व्यवस्थापन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या, सचिव सौ. वर्षा जाधव म्हणाल्या, की तरुणांनी संकटाच्या काळात देशासाठी सैनिका सारखे काम करावे. जेव्हा समाजात अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. नैसर्गिक आपत्ती येतात वादळ, महापूर, आग, अशा परिस्थितीत तरुणांनी समय सूचकता दाखवून समाजाची सेवा केली पाहिजे असे अहवान केले.
या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. हिमांशू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की या राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल तर शिस्तप्रियता, आत्मविश्वास, संयम या गोष्टी जर अंगीकारल्या तर आपण यशाचे शिखर गाठू शकतो असे आवाहन करत राष्ट्रीय क्रीडा दिनाला शुभेच्छा दिल्या तर आपात्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेचे अध्यक्ष संजय जाधव म्हणाले की, आज राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस हा क्रीडा दिवस म्हणून साजरा करत असतो मेजर ध्यानचंद यांनी आपले कौशल्य पणाला लावून आपल्या देशासाठी हॉकी या खेळात अनेक सुवर्णपदक मिळवून दिले. खेळ हा शारीरिक आरोग्यासाठीच फक्त खेळायचा नसतो, तर खेळामधून शिस्त आणि नियमांचे पालन करावयाचे असते आपले मानसिक शारीरिक आरोग्यासाठी नेहमीच खेळाचा सराव हा उपयुक्त असतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक मैदानी खेळ खेळले पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण हे खेळण्यातूनच प्राप्त होत असतात. युवक हा बलवान असतो. त्याने मैदानावर सतत उपस्थित राहून अभ्यासाच्या व्यतिरिक्त, विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन आपला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करून घ्यावा, आजच्या या कार्यशाळेत आपल्याला अनेक गोष्टींविषयी माहिती मिळेल ती आपण आपल्या मनात साठवून ठेवावे व आपातकालीन परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा. त्याचा समाजालाही लाभ मिळेल यासाठी आपण कार्यतत्पर राहिले पाहिजे. तसेच आजच्या या कार्यशाळेत ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, या प्रमाणपत्राचा उपयोग हा आपण वनविभाग तसेच सैन्य दलाची आरक्षित जागा मिळवण्यासाठी करू शकतो, उद्याचा बलशाली भारत निर्माण करण्यासाठी जो विद्यार्थी दशेत खेळतो तोच खरा जीवन जगतो. म्हणून विद्यार्थ्यांनी जास्त जास्त खेळांमध्ये सहभाग घेऊन आपात्कालीन परिस्थितीमध्ये मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करावा, असे आव्हान केले.
या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेत ओझर येथील नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक मार्गदर्शक रामसिंग बागुल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील नागरिकांसाठी आपात्कालीन परिस्थितीत आपले कर्तव्य केले पाहिजे अशा परिस्थितीत तरुणाने धावून गेले पाहिजे. भारतात 1968 पासून आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची निर्मिती करण्यात आली, यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. आपण मैदानावर विविध खेळ खेळतो खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल अशा खेळांमध्ये आपल्या शरीराला, हाता पायाला, दुखापत होऊ शकते. अशावेळी आपल्याला प्राथमिक उपचार करता आले पाहिजे. याच बरोबर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती महापूर, चक्रीवादळ, सर्पदंश, हृदयविकाराच्या झटका अशावेळी आपल्याला उपयुक्त असे प्रथमोपचार आणि त्यातील तांत्रिक बाबी माहिती असणे गरजेचे असते. जर अचानक हृदय बंद पडले, तर अशा व्यक्तीला सी.पी.आर हा कशा पद्धतीने द्यावा या विषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच अनेक वेळा आपल्याला दोराच्या सहाय्याने उंचावर जावे लागते त्यावेळेस दोरांच्या गाठीचा उपयोग कशा पद्धतीने करावा, याचेही प्रशिक्षण दिले. त्यांनी चोरगाठ, बैलगाठ, खुर्चीगाठ, चपटीगाठ, साधीगाठ, कमांडो ब्रिज, त्रिकोणी जोडी अशा विविध दोरगाठींचे प्रात्यक्षिक करून संकटाच्या काळात आपत्कालीन परिस्थिती तरुणांनी देशासाठी व समाजासाठी सेवा केली पाहिजे. हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध खेळ, नृत्य, गायन, क्रीडा या क्षेत्रात सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा असे सांगितले, या कार्यशाळेच्या समारोपा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच महाविद्यालयातील विविध कार्यक्रमात आणि उपक्रमात तसेच शिबिरे, कार्यशाळा, आणि क्रीडा क्षेत्रात सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा, असे अहवान केले. या क्रीडा दिवसाच्या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाविषयी विद्यार्थ्यांनी "स्पर्श" हे भित्तीपत्र तयार केले. त्या माध्यमातून क्रीडा दिवसाची ओळख करून दिली. महाविद्यालयातील कु. सीओना अहिर, धीरज जाधव, विशाल ईशी, किरण पावरा, यांनी क्रीडा दिनानिमित्त स्पर्श भित्तीपत्र तयार केले. या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक आर. आर. सोनवणे, यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. एच. एस. पाटील, प्रा. डॉ. आर. डी. पाटील, प्रा. राम हजारी, तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.