*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळ, व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंदुरबार शहरात मंगळवारी पहिल्या टप्प्यातील श्रींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळ व व्यायाम शाळेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष व कार्यकर्ते तसेच गणेश भक्तांच्या सत्कार आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, राम रहीम उत्सव समिती तर्फे करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे यंदाही गणपती मंदिर चौकात सत्कार करण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 5 वाजेपासून आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवलाल सोनार यांच्या पालखीचा मानाच्या गणपती सायंकाळी 6 वाजता गणपती मंदिर चौकात आला असता त्या ठिकाणी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पूजा अर्चा करीत मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार केला. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत आ.रघुवंशी यांनी ढोल ताशांच्या ठेक्यावर नृत्य केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.