*राजेंद्र कुमार गावित यांच्या महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजेंद्र कुमार गावित यांच्या महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव*
*राजेंद्र कुमार गावित यांच्या महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील के डी गावित शैक्षणिक संकुलात गौरव सोहळा" मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद चेअरमन राजेंद्र कुमार गावित यांना "महाराष्ट्र रत्न' पुरस्कार प्राप्त झाल्याच्या निमित्ताने करण्यात आले होते. राजेंद्रकुमार गावित यांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्वेशन लंडन यु.के येथे सदर "महाराष्ट्र रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. या सन्मानाच्या निमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच भूमीत मिळालेला 'महाराष्ट्र रत्न' हा पुरस्कार खरंच असामान्य आहे. या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्रातील 4 खासदार, महाराष्ट्रातील 11 कॅबिनेट मंत्री, 24 आमदार, ब्रिटिश पार्लमेंटचे भारतीय वंशाचे दोन खासदार तसेच ज्यांचा पाचशे ते हजार कोटींचा व्यवसाय आहे असे 20 पेक्षा अधिक उद्योगपती अशा भारतातील एकूण 80 ते 85 रत्नांच्या पंक्तीत पहिल्या वीस रत्नांमध्ये समावेश होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य इ क्षेत्रात केलेले कार्य समाजकार्य यांचा बळावरच हा पुरस्कार मिळालेला आहे. कार्यक्रमात व्यासपीठावर आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे संचालिका ईला राजेंद्रकुमार गावित, तसेच आदिवासी युवक क्रीडा विकास मंडळ संस्थेचे सचिव डॉ.विभूती गावित, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सचिव ऋषिका गावित, तसेच प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीत अभिनंदनपर भाषण केले. त्यांच्या सोबत अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या भाषणांतून कार्याची प्रशंसा केली.
गौरव सोहळ्यात अभिवादनपर भाषणे, व सत्कार समारंभ यांचा समावेश होता. या सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील कार्यकर्त्यांना नवचेतना व प्रेरणा मिळाली असुन यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. शहादा तळोदा मतदार संघातील माजी आमदार पद्माकर वळवी, शहादा नगरपालिका माजी नगर अध्यक्ष जहीर शेख, रमाकांत पाटील, जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे विद्यमान तसेच माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते यांचे देखील गौरव सोहळा निमित्ताने उपस्थिती लाभली. याप्रसंगी संस्थेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाराष्ट्र रत्न पुरस्कृत राजेंद्रकुमार गावित यांचा सत्कार सन्मान केला.