*दंगा व चोरीसारख्या गुन्हयांमधील आरोपींना सण उत्सवांदरम्यान जिल्हयातील विविध ठिकाणी प्रवेशास मनाई*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दंगा व चोरीसारख्या गुन्हयांमधील आरोपींना सण उत्सवांदरम्यान जिल्हयातील विविध ठिकाणी प्रवेशास मनाई*
*दंगा व चोरीसारख्या गुन्हयांमधील आरोपींना सण उत्सवांदरम्यान जिल्हयातील विविध ठिकाणी प्रवेशास मनाई*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारतीय नागरिक सुरक्षा कायदा कलम 163 अन्वये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई,
गणेशोत्सव व ईद ए मिलाद या उत्सवाचे पार्श्वभूमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. दंगा, चोरी, इतर गंभीर गुन्हयांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीवर तसेच समाजकंटक इसमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना गणेशोत्सव काळात जिल्हयातील विविध ठिकाणी त्यामध्ये शहर पोलीस ठाणे हद्दीत एकूण 42, शहादा पोलीस ठाणे हद्दीत एकुण 3, धडगाव पोलीस ठाणे हद्दीत 1 तर म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत 1 तसेच नवापुर पोलीस ठाणे हद्दीत एकुण 3 अशा जिल्हयातील एकुण 50 इसमांना प्रवेशास मनाई आदेश पोलीस प्रशासनातर्फे जारी करण्यात आले आहेत. या आदेशामुळे नागरिकांना सण आनंदात, शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करता येईल. पोलीस विभागाकडून सर्व गणेश मंडळांना तसेच नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात येत असुन कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस विभागाने केले आहे. सदर मनाई आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी आशित कांबळे यांच्यातर्फे काढण्यात आले आहेत.