*हजरत मोहम्मद पैगंबर साहब जयंतीनिमित्त हाश्मी कमिटी नंदुरबारतर्फे मुफत खतना शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हजरत मोहम्मद पैगंबर साहब जयंतीनिमित्त हाश्मी कमिटी नंदुरबारतर्फे मुफत खतना शिबिर संपन्न*
*हजरत मोहम्मद पैगंबर साहब जयंतीनिमित्त हाश्मी कमिटी नंदुरबारतर्फे मुफत खतना शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार 31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी डॉ अल्लामा इक्बाल हॉल मच्छी बाजार नंदुरबार येथे, हजरत मोहम्मद पैगंबर सहाब जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय मोफत खतना शिबीरचे आयोजन हाश्मी कमिटी नंदुरबारच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, सदर खतना कॅम्पमध्ये एकूण 145 मुलांची मुफत खतना करण्यात आलेली आहे,
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नंदुरबारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष सय्यद जाकीर मिया जागीरदार हे होते, तसेच उद्घाटक म्हणून शरीफोदिन मुशिरुद्दीन शेख उर्फ राजू दादा मिस्तरी होते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हाश्मी कमिटी बिल्लीमोरा गुजरात येथील अब्दुल गणी कादर मेमन, हनिफ कासम मेमन, साजिद धनानी, हनिफ आगबानी, नंदुरबार येथील शब्बीर अब्दुल, गणी मेमन, संचालक स्मिथ हॉस्पिटल, सय्यद रफत हुसेन माजी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष एम आय एम. मोहम्मद हुसेन भाई नाथांनी उर्फ मुन्ना. पीरन हुसेन पिंजारी, सय्यद इद्रिस तलोदा, असलम समद, पिंजारी रनाला, हाजी गफार, मस्तान तौसिफ मियां मोबाईल हे होते,
कार्यक्रम अतीउत्तम रीत्याने पार वाहवा म्हणून परिश्रम करणारे आसिफ शेख जैनुद्दीन, इमरान मोहम्मद काकर, गुलाम अली मसूद खान, आवेश मिया मजीद मियां, तौसिफ मिया जहागीरदार, नूर अहमद मुनवर खान इरफान मोहम्मद काकर, जावेद खान इमाम खान उर्फ जावेद मच्छी, आतिफ शेख, दानिश सलीम मेमन,सय्यद वकार सय्यद वहाब,सद्दाम अब्दुल जब्बार, सय्यद बिलाल मिया जहागीरदार आदीनी परिश्रम घेतले, सदर कार्यक्रम हाश्मी कमिटी नंदुरबारच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, या करिता गणि इस्माइल मेमन, फारूक अब्दुल गणी मेमन, सय्यद अजहर पीरजादा या लोकांनी आयोजन केले होते,
कार्यक्रमाचे उद्दिष्ट मांडताना अजहर मियां जागीरदार यांनी सांगितले की, हे कार्यक्रम मोहसीने मिल्लत्, हजरत सय्यद पीर बापू कादरी रज्जाकी उर्फ हाश्मी बापू उना गुजरात यांच्याशी प्रेरित होऊन यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केले आहे, आमचे धार्मिक गुरु हाश्मी बापू हे आम्हाला नेहमी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आहात आतापर्यंत हाश्मी बापू यांनी जवळपास साडेतीन हजार जोडप्यांचे लग्न लावून दिलेले असून, असे अनेक खतना कॅम्प संपूर्ण गुजरात मध्ये ते आयोजित करत आहेत हे आमचे दुसरे वर्ष असून, आम्ही दरवर्षी ईदमिलादच्या निमित्ताने हे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे, मागच्या वर्षी 2024 ला पण असेच एक खतना कॅम्प ईद-ए- मिलाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते त्या वेळेला 86 मुलांची खतना मोफत करण्यात आली होती यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करताना हाश्मी कमिटीचे सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळा मध्ये हाश्मी कमिटीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
कुरान पठण हाफिज सलमान यांनी केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस खान सत्तार खान पठाण करणखेडा यांनी तर आभार प्रदर्शन नगर सेवक फारुख अब्दुल गणी मेमन यांनी केले.