*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा*
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील हिरा प्रतिष्ठान संचलित पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व हिरा उद्योग समूहाचे संचालक नरेंद्र हिरालाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका चेतना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांचे हॉकी मधील योगदानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा शिक्षक विशाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त खेळात सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोबाईल व संगणक कडे जास्त कल असल्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेतल्यामुळे शरीर सदृढ व निरोगी राहते, याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला चौरे यांनी केले. आभार नितीन साळी यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक सुरेंद्र पाटील, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, अमोल भदाणे व शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, सुधाकर ठाकूर आदी उपस्थित होते.