*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे, सर्प विज्ञान व विज्ञान चमत्कार प्रदर्शन, कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रबोधन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे, सर्प विज्ञान व विज्ञान चमत्कार प्रदर्शन, कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रबोधन*
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे, सर्प विज्ञान व विज्ञान चमत्कार प्रदर्शन, कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रबोधन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्प विज्ञान प्रबोधन व चमत्कार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान विषयाचे शिक्षक सी.व्ही.नांद्रे यांच्या हस्ते पाण्यावर चालणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून करण्यात आले. अ. नि.स.चे प्रधान सचिव बलदेव वसईकर व सदस्य राजेंद्र पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भारतातील विविध विषारी व बिनविषारी सापांची माहिती दिली. तसेच त्यांचे वास्तव्य, ओळख, भक्ष्य इ. विषयक व जनसामान्यांच्या मनावर भोंदूगिरी करणारे कसे विविध चमत्कार व हातचलाखी करून फसवणूक केली जाते तर त्या मागील वैज्ञानिक पार्श्वभूमी सादरीकरणाद्वारे बलदेव वसईकर यांनी प्रात्यक्षिकांसह सादर केले. व उपक्रम प्रमुख राजेंद्र पिंपळे यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.बी. भारती व आभार एम.एस.मराठे यांनी मानले.