*प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार–पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार–पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
*प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार–पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
नागपूर(प्रतिनिधी):-कामठी विधानसभा क्षेत्रातील गावांमधील गोर गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काचे घर देण्यात येईल त्यासाठी झुडपी जंगलाची जमीन व पट्टे ग्रामपंचायतीला सुपुर्द करु तसेच मालमत्तेची सनद (प्रॉपर्टी कार्ड) न मिळालेल्या गावकऱ्यांना सनद देवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. गावभेट कार्यक्रमांतर्गत बावनकुळे यांनी आज कामठी विधानसभा क्षेत्रातील पावनगाव -धारगाव या गटग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. माजी आमदार टेकचंद सोनवणे, पावनगाव -धारगाव गटग्रामपंचायतीच्या सरपंच नेहा राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. गावातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. झुडपी जंगल भागात ज्यांची घरे आली त्यांच्या बाबत येत्या काळात मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोबतच गावामध्ये असलेल्या शासकीय जमिनीवर बेघरांना घर देण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकार देण्यात येतील असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी आठवडयातील एक दिवस गाव भेट करावी. कामठी तालुक्यातील जनतेच्या समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आठवडयातील एक दिवस निश्चित करुन गावांना भेटी दयाव्या व यासंदर्भातील तीन महिण्यांचा कार्यक्रम आखावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. विविध गावांना त्यांनी भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला.