*आयएमए नंदुरबारतर्फे ध्वनी व प्रकाश प्रदूषणासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर, खासगी समारंभ, जयंती, लग्नविधींसह सर्व कार्यक्रमांमध्ये जनजागृतीची गरज*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आयएमए नंदुरबारतर्फे ध्वनी व प्रकाश प्रदूषणासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर, खासगी समारंभ, जयंती, लग्नविधींसह सर्व कार्यक्रमांमध्ये जनजागृतीची गरज*
*आयएमए नंदुरबारतर्फे ध्वनी व प्रकाश प्रदूषणासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर, खासगी समारंभ, जयंती, लग्नविधींसह सर्व कार्यक्रमांमध्ये जनजागृतीची गरज*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नंदुरबारच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेऊन ध्वनी व प्रकाश प्रदूषणासंदर्भात निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात अध्यक्ष डॉ. राजेश वसावे, सचिव डॉ. स्वगात शहा, कोषाध्यक्ष डॉ. गणेश पाकळे, ज्येष्ठ सदस्य डॉ. लालचंदानी आणि माजी अध्यक्ष डॉ. रोशन भांडारी यांचा समावेश होता.
IMA नंदुरबारतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात सण-उत्सवांबरोबरच लग्न समारंभ, जयंती, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर खासगी समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या डीजे साउंड सिस्टिम आणि लेझर लाईट्समुळे होणाऱ्या ध्वनी व प्रकाश प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळाने सांगितले की, अति उच्च ध्वनीमुळे झोपेचे विकार, मानसिक तणाव, रक्तदाब वाढणे, आणि हृदय व मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतो. विशेषतः वृद्ध नागरिक, लहान मुले, गरोदर महिला व आजारी रुग्ण यांना याचा गंभीर त्रास होतो. या निवेदनावर पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच, सामाजिक जबाबदारी म्हणून केवळ वैद्यकीय संस्था नव्हे, तर इतर व्यावसायिक व सामाजिक संस्थांनीही पुढे येऊन जनजागृती करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
“समारंभ साजरे करताना इतरांच्या आरोग्याचा विचार होणे गरजेचे आहे. कायद्याचे पालन आणि समाजप्रबोधन यातूनच प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण होईल,” असे मत SP साहेबांनी मांडले. IMA नंदुरबारचे अध्यक्ष डॉ. राजेश वसावे यांनी सांगितले की, संस्थेचा उद्देश फक्त त्रासदायक गोष्टींना विरोध करणे नाही, तर आरोग्यपूर्ण आणि समजूतदार समाज घडविण्यासाठी प्रशासन, शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांबरोबर समन्वय साधून सकारात्मक प्रयत्न करणे हा आहे. हा उपक्रम आरोग्यदायी, सुरक्षित आणि जबाबदार नंदुरबार निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो.