*श्रॉफ हायस्कूलची जिल्हास्तरीय कला उत्सवात विजयी कामगिरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रॉफ हायस्कूलची जिल्हास्तरीय कला उत्सवात विजयी कामगिरी*
*श्रॉफ हायस्कूलची जिल्हास्तरीय कला उत्सवात विजयी कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कलाउत्सव 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत एकल नाट्य, द्विआयामी व त्रिआयामी दृश्यकला प्रकारात यश संपादन केले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या विद्यमाने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कलाउत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नंदुरबार येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. एकल नाट्य प्रकारात तन्वी जितेंद्र गोसावी प्रथम, दृश्यकला (द्विआयामी) प्रकारात आरुषी युवराज बागुल प्रथम, तसेच दृश्यकला (त्रिआयामी) प्रकारात रोशनी सुनील मराठे प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशाच्या परंपरेत मानाचा तुरा रोवला. विशेष म्हणजे या विद्यार्थिनींची विभागस्तरीय कलाउत्सवासाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, शिवाजी माळी व देविदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतांचे मनीषभाई शाह, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.