*सुहासिनी नटावदकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुहासिनी नटावदकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न*
*सुहासिनी नटावदकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय तथा जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सुहासिनी नटावदकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज एकलव्य विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सुहासिनी नटावदकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात शाळेने उत्तुंग झेप घेतली आहे. विद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात पसरलेला आहे असे प्रतिपादन केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, सुहासिनी नटावदकर यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी केली आणि विद्यार्थी हिताचे अनेक प्रश्न सोडविले. राजकारणातही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले व नंदुरबार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणाऱ्या महिला त्या ठरल्या असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या अनेक निर्णयामुळे आज एकलव्य विद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली निवड ठरत असून त्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते असे म्हटले. याप्रसंगी खासदार गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, नंदुरबार नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ शशिकांत वाणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, संगीता गावित, दिलीप नाईक, उपशिक्षणाधिकारी डॉ युनुस पठाण, डाएटचे प्राचार्य रमेश चौधरी, अधिव्याख्याता विनोद लवांडे, डॉ. दीपक अंधारे, डॉ सी. डी. महाजन, डॉ टिळेकर, विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, पत्रकार, डॉक्टर, वकील तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर डॉ सुहास नटावदकर, डॉ रजनी नटावदकर, रोहन नटावदकर, जयदीप नटावदकर, समिधा नटावदकर, सुहास वसावे, जयकुमार वसावे उपस्थित होते. याप्रसंगी सुहासिनी नटावदकर यांचा जीवनपट दाखवण्यात आला. हा जीवनपट डॉ गिरीश पवार, विलास मराठे, कल्पेश तांबोळी आणि नितीन पाटील यांनी तयार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.