*29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने मेजर ध्यानचंद हॉकी चषक, खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने मेजर ध्यानचंद हॉकी चषक, खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न*
*29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने मेजर ध्यानचंद हॉकी चषक, खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मेजर ध्यानचंद हॉकी चषक सपन्न
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व जिल्हा हॉकी असोसिएशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त 29 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते, यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सेवा निवृत्त क्रीडा संचालक ईश्वर धामणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, महेंद्र काटे, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव खुशाल शर्मा, राष्ट्रीय खेळाडु कुणाल भट, उमेश राजपुत, प्रकाश मिस्तरी, योगेश कुंभार, दिपमाला गावीत, एैजाज खाटीक हे उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम प्राविण्य शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार (सिनियर बॉईज), व्दितीय एस. ए. मिशन हायस्कुल, नंदुरबार, तृतीय शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार(ज्यु. बॉईज) आणि मुलींमध्ये प्रथम प्राविण्य शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार, व्दितीय श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय, वैंदाणे, तृतीय एस. ए. मिशन हाय, नंदुरबार, या शाळांनी प्राविण्य प्राप्त केले.
उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडा संचालक ईश्वर धामणे यांनी खेळाडूंना क्रीडा विषयक मार्गदर्शन केले व खेळाडुंना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व्दारा राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 04.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे जिल्ह्यातील राज्य पातळीवर प्राविण्य प्राप्त खेळाडू 77, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू 38, व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू 03 तसेच खेलो इंडिया व ऑल इंडिया युनिव्हरसिटी 02 असे एकूण 120 प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेल्या खेळाडूं विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले तसेच सन 2022-23 या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या 07 शाळांना व सन 2023-24 या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या 06 शाळांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित खेळाडू, क्रीडा शिक्षक, पालक, प्रमुख पाहुणे यांनी खेळ व तंदुरुस्ती बाबत शपथ घेतली.
सदर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन शिवछत्रपती पुरस्कारर्थी बळवंत निकुंभ, श्रीमती सुशमा शहा प्राचार्या श्रॉफ हायस्कुल, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदिप पवार तहसिलदार नंदुरबार, मोहन अहिरराव उपप्राचार्य डी आर हायस्कूल, महेश पाटील तालुका क्रीडा अधिकारी, मीनल वळवी तालुका क्रीडा संयोजक, आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओमकार जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. तसेच बळवंत निकुंभ यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय बेलोरकर यांनी करुन अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली. सदर राष्ट्रीय क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे, भगवान पवार क्रीडा मार्गदर्शक, ओमकार जाधव, क्रीडा अधिकारी, संजय बेलोरकर क्रीडा अधिकारी, कार्यालयाचे मुकेश बारी, महेन्द्र काटे, कल्पेश बोरसे, दिगंबर चौधरी, सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.