*पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडून नायगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पहानी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडून नायगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पहानी*
*पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडून नायगांव तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पहानी*
नांदेड(प्रतीनिधी):-नुक्तेच 27, 28, 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यासह नायगांव तालुक्याला जोरदार फटका बसल्यामुळे जिकडेतिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली, शेती पिकांसह गावात घरांचेही प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी आज शनिवारी नायगांव तालुका परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शासन आपणास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले आहे. नायगांव तालुक्यातील बरबडा, नायगांव शहरातील शंकरनगर, दत्तनगर, बैलबाजार, कुंचेली (जुनेगाव) आदी भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली दरम्यान नायगांव नगरपंचायतचे उपनगरअध्यक्ष विजय चव्हाण यांनी शहरातील नुकसानी बाबत निवेदन दिले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी नायगांव, उमरी, धर्माबाद, मुखेड या भागात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या या आशयाचे निवेदन दिले. दौरा सुरु आसतांना कुंचेली जुण्या गावाला भेट न देता पुनर्वशीत गाव कुंचेली येथून पालकमंत्री परत गेल्यामुळे तेथील काही लोकांनी पुराच्या पाण्यात बसून आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नायगांव बिलोली विभागाच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानगावकर नायगांवच्या तहसीलदार धम्मप्रिय गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष संतूकराव हंबर्डे, माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, बालाजी मद्देवाड, मनोहर पवार, नायब तहसीलदार विजय येरावाड, गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आदींची उपस्थिती होती.