*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाळू मातीच्या गणेशमुर्ती विक्री केंद्राचे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरू नंदकुमार जाधव यांच्याहस्ते शुभारंभ

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाळू मातीच्या गणेशमुर्ती विक्री केंद्राचे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरू नंदकुमार जाधव यांच्याहस्ते शुभारंभ
*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाळू मातीच्या गणेशमुर्ती विक्री केंद्राचे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरू नंदकुमार जाधव यांच्याहस्ते शुभारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे नागरीकांनी शाडू मातीच्या गणेश मुर्तींची स्थापना करुन पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. श्री गणेश कला केंद्राच्या वतीने दुकान क्रमांक -1, जुनी नगरपालिका कॉम्प्लेक्स, मेन रोड याठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाडू मातीच्या श्री गणेश कला केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उद्योगपती कालू कटारिया, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिग्विजय ठाकरे, सनातन संस्थेचे दत्तात्रय वाघुळदे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, आकाश गावित, भूषण पाटील, चेतन गवळी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरू नंदकुमार जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि श्री गणेशाची आरती करून पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार सुसंगत अशा शाडूमातीच्या श्री गणेशमुर्त्यांचे वितरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान श्री गणेश कला केंद्राचे संचालक राहुल मराठे म्हटले की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे पाण्याचे प्रदुषण होत असल्याने प्रशासनावर ताण येतो, शाडू मातीच्या पर्यावरण पुरक मुर्त्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास प्रशासनाच्या भार हलका होऊ शकतो. तसेच पर्यावरणपुरक उपक्रमांना विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच शाळू मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणेशमुर्तीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून असे उपक्रम प्रत्येकाने राबविले पाहीजे. तसेच त्याचा प्रसार देखील करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु केला त्या उद्देशाला धरून प्रत्येक मंडळांनी आदर्श कृती आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविले तर खऱ्या अर्थाने आदर्श गणेशोत्सव साजरा होऊन श्री गणेशाची कृपा देखिल आपल्या सर्वांवर होईल. शहरातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळात मोठमोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेश मूर्तींची स्थापना करण्या ऐवजी शाळू मातीच्या लहान गणेश मूर्तींची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच अनेक मंडळांकडून देखील यंदा शाळू मातीच्या मूर्तींची स्थापना केली जाणार असल्याचे राहुल मराठे यांनी सांगीतले.