*लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजयी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजयी*
*लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजयी*
व्यारा(प्रतिनिधी):–व्यारा येथे पार पडलेल्या 59 व्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझर येथील 3 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात खुशी पाडवी व गुंजेश शर्मा यांनी तर 17 वर्षांखालील वयोगटात निखिल चौधरी आणि आर्यन पाडवी यांनी उत्तम कामगिरी करत विजय संपादन केला. यशस्वी खेळाडूंची आता झोनल शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन देवराम पटेल, मुख्याध्यापिका सौ. शीतल शर्मा, तसेच संतोष वळवी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कराटे प्रशिक्षक जगदीश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले