*डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब कडून वृक्षांना क्यु आर कोड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब कडून वृक्षांना क्यु आर कोड*
*डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब कडून वृक्षांना क्यु आर कोड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डी.आर.हायस्कूल मध्ये इको क्लब लाईफ मिशन अंतर्गत शाळेच्या आवारात लावलेल्या वृक्षांना क्यु आर कोड लावण्यात आले. यात झाडाचे मराठी नाव,इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव, झाडाचे वर्णन, उपयोग तसेच वृक्षारोपण करताना चे फोटो, इ.माहिती अपलोड करण्यात आली आहे. वरील माहिती शाळेतील विद्यार्थी यांच्याकडून संग्रह करून लावण्यात येते. शाळेतील सर्व वृक्षांना क्यू आर कोड लावण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे. तसेच या या प्रसंगी चे शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या घराच्या आजूबाजूला परिसरात,शेतात,घराच्या छतावर, परसबाग तयार करावी. त्यात उपयोगी रोपटे लावावीत. असे आवाहन केले.
यावेळी एक पेड माॅ के नाम उपक्रम अंतर्गत माता पालक संघ कडून शाळेच्या आवारात लावण्यात झाडांना आलेल्या क्युआर कोड लावण्यात आले. करण्यात आले.
या वेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार, पर्यवेक्षक संजय सैंदाणे,ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गायकवाड, माता पालक संघाचे सचिव योगिता साळी, इको क्लब प्रमुख निलेश गावीत, इको कल्ब शिक्षक सदस्य दिलीप पाटील, शितल भट, प्रशांत पाटील, भुषण मराठे, कविता भंडारी, चंद्रशेखर पाटील, नितेश ठाकरे, प्रशांत पाठक व इको क्लबचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वृक्ष जतन व संवर्धनाची शपथ घेण्यात आली.