*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ आयोजित बाल क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ आयोजित बाल क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात*
*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ आयोजित बाल क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-संस्थेतील खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, बालपणापासूनच त्यांच्यामध्ये खेळांविषयी आवड निर्माण होण्यासाठी व त्यांचे क्रीडा नैपुण्य वाढण्यासाठी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ तर्फे दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी बाल क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभेचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे माजी राष्ट्रीय खेळाडू जयदीप नटावदकर यांनी बाल क्रीडा महोत्सव आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घेऊन स्वतः मधील खेळाडूचा विकास करावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या प्रमुख संबोधनात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी खेळांचे महत्त्व स्पष्ट केले. खेळाडूंसाठी अतिशय सखोल मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की खेळाडूंसाठी पोशाखापासून तर आहारापर्यंत सर्व लहान लहान गोष्टींचे खूप मोठे महत्त्व असते. आपल्या भागातून मोठ्या प्रमाणावर यश मिळवून क्रीडा क्षेत्रात मोठे झालेल्या खेळाडूंचा आदर्श या बाल खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. मी स्वतः सहा खेळ खेळलेला खेळाडू आणि मार्गदर्शक असल्यामुळे खेळाचे महत्व मी चांगलेच जाणतो, विविध खेळ खेळल्याने आपण सतत निरोगी व उत्साही राहतो त्यामुळे एकातरी खेळात आपण नैपुण्य प्राप्त केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे उपाध्यक्ष कुवारसिंग वळवी यांनी केला. संस्थेने खेळाडूंना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्या सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी उत्तम खेळ करून संस्थेचा नावलौकिक उंच व्हावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर, सचिव सुहास वसावे, संचालक जयकुमार वसावे, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, रोहन नटावदकर व ईश्वर धामणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा घासकडबी यांनी केले तर आभारप्रदर्शन गौरीशंकर धुमाळ यांनी केले.