*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):- येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यांनी महात्म्यांचे कार्य आणि त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील, प्राध्यापक, प्राध्यपकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा.डॉ.उपेंद्र धगधगे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी सखोल अशी माहिती दिली.कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा.डॉ.मनोज शेवाळे, प्रा.डॉ.डी. एस.पाटील, प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले.