*लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले*
*लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथे संस्थेचे सचिव ऋषिका गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तळोदा प्रादेशिक वनविभागातील वनक्षेत्रपाल शंतनु सोनवणे यांनी वृक्षदिंडीचे अध्यक्ष स्थान भूषविले. यावेळी वनक्षेत्रपाल मनीषा कदम, वनपाल अपर्णा लोहार, वनपाल भारती सयाईस, वनरक्षक संदीप भंडारी, वनरक्षक महेंद्र तडवी, वनरक्षक सपना वसावे, दीपक बाळदे आदी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी वनक्षेत्रपाल शंतनु सोनवणे यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने भविष्यात होणारे संभाव्य धोक्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगत आपण उद्या भावी पिढीचे सुज्ञ नागरिकांची पर्यावरण बाबत जबाबदारी सांगितली. वृक्षदिंडी साठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव ऋषिका गावित, माजी जि प सदस्य दिवाकर पवार, तळोदा गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, केंद्रप्रमुख दशरथ वायकर, पं.सं सदस्य चंदन पवार, मुख्याध्यापक जि प मराठी शाळा लाखापूर ज्ञानेश्वर मराठे, मुख्याध्यापक जि प मराठी शाळा बन दारासिंग ठाकरे, मुख्याध्यापक
न्यूबन, मुख्याध्यापक धनपूर, उपसरपंच सागर पवार, माजी सरपंच सरदार ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक ठाकरे, समाजसेविका गोमीबाई ठाकरे, अमरसिंग ठाकरे, महेश ठाकरे, रूपा ठाकरे, ऋषी नाईक, सुनील ठाकरे, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, वृक्ष दिंडीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदाय वेशभूषेत विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचा संदेश दिला. वृक्ष दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती.
वृक्ष दिंडी संपूर्ण गावात फिरून वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गावातून प्रभात फेरी काढत वृक्षारोपणाचा जागर
करण्यात आला. विद्यार्थ्यांनी "एक पेड मां के नाम" या उपक्रमांतर्गत स्वनिर्मित फलकातून झाडे लावा झाडे जगवा, एक जीव एक झाड, अशा अनेकविध घोषणा देत वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे यांनी तर आभार अनिल भामरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक फिरोजअली सय्यद, संजय पाटील, यांनी केले. तर वृक्षदिंडी पालखी सजावट श्रीमती सुवर्णा कोळी, चंदू पाडवी, तर उत्कृष्ट फलक लेखन मंगल पावरा यांनी केले.