*सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे-रविंद्र पाटील*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे-रविंद्र पाटील*
*सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे-रविंद्र पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व पात्र सहकारी संस्था, सहकारी बँका आणि पतसंस्थांना यांनी सन 2023 -2024 या आर्थिक वर्षाच्या सहकार पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रानुसार, विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर करायचे आहेत. प्रस्ताव सादर करण्याच्या कालबद्ध कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली असून प्रस्ताव 18 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करता येतील. याबाबत शंका किंवा अडचणी असल्यास, संबंधित निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून निरसन करून प्रस्ताव मुदतीत सादर करावे. या उपक्रमात जास्तीत जास्त सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे, असेही उपनिबंधक पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.