*राज्यपाल पुरस्कार स्काऊट्स विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी मार्फत देवरे विद्यालयाचा गुण गौरव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यपाल पुरस्कार स्काऊट्स विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी मार्फत देवरे विद्यालयाचा गुण गौरव*
*राज्यपाल पुरस्कार स्काऊट्स विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी मार्फत देवरे विद्यालयाचा गुण गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील आठ विद्यार्थी राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले त्यात चि. तेजस काशिनाथ पाटील, पारस मनोहर पाटील, गौरव विजय पाटील, महेश नारायण पाटील, सुमित रवींद्र पाटील, पृथ्वीराज प्रशांत सोनवणे, भावेश मधुकर साळुंके, सचिन अनिल मराठे यांचा समावेश असून विद्यार्थ्यांना देवरे विद्यालयाचे मार्गदर्शक शिक्षक डी.बी.भारती यांच्यासह नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, जिल्हा आयुक्त गाईड रत्ना रघुवंशी, जिल्हा मुख्यालयीन आयुक्त गाईड वर्षा ताई जाधव, जिल्हा स्काऊट प्रशिक्षक हेमंत पाटील, जिल्हा स्काऊट संघटक महेंद्र वसावे, जिल्हा संघटक गाईड संगीता रामटेके, जेष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावंत, जोसेफ गावित, सहाय्यक प्रशिक्षक हिरालाल पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र गुरव, संकेत माळी, प्रसाद दीक्षित या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे शालेय समिती अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, प्राचार्य सतिश देवरे, पदाधिकारी व देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके तसेच पंचक्रोशीतील विखरण, नाशिंदे, बोराळा, खापरखेडा येथील पालक वृंद व ग्रामस्थांकडून कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.