*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधि):-शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनिल खैरनार व परीक्षक म्हणून लाभलेले एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक अन्सार शेख, किरण देहनकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण 65विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. पहिली व दुसरी लहान गट, तिसरी व चौथी मोठा गट लहान गटातून प्रथम क्रमांक कु. आर्या चंद्रकांत बेडसे, इयत्ता दुसरी, द्वितीय क्रमांक कु. सानवी रामचंद्र तांबोळी इयत्ता पहिली, तृतीय क्रमांक कु. भाग्येश संदीप शिवदे इयत्ता दुसरी, उत्तेजनार्थ वेदांत नितीन पाटील इयत्ता पहिली, हिमांशू प्रेमचंद पाटील, मोठा गट प्रथम भार्गवी नितीन पाटील इयत्ता चौथी, कार्तिक आशिष पाटील इयत्ता तिसरी, द्वितीय क्रमांक तनिष्का कांतीलाल वसावे इयत्ता चौथी, दूर्वा विशाल महाजन इयत्ता चौथी, तृतीय क्रमांक हर्षल जीवन पाकळे आदी विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. विजयी विद्यार्थ्यांचे अध्यक्षांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती पुनम बाळू बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती प्रणाली बोरकर, तरुलता कुलकर्णी दिपाली पाटील, रंजीता वळवी, मोनिका नेरे, अंकिता पाटील, मिनल पाटील, दिव्या पवार, कविता ठाकरे, निलेश पाटील, श्रीराम मगर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.