*बालअमराई येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची वनविभागासमवेत बैठक, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बालअमराई येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची वनविभागासमवेत बैठक, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन*
*बालअमराई येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची वनविभागासमवेत बैठक, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-31 जुलै 2025 रोजी मौजे बालअमराई तालुका नवापूर येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे
वनपाल युवराज भाबड यांनी ग्रामस्थामध्ये जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले,
यात पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवावे, रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा, बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो, रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरित्या लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळावे, लहान मुलांना व वृद्धांना एकटी सोडू नका,
रात्री एकटी पाई फिरताना शेतात जाताना जवळ टॉर्च व काठी बाळगा मोठ्याने म्युझिक लावा, घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाईट लावा, घराच्या आसपास झाडे झुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा,
घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्याकडे आकर्षित होतो,
अचानक बिबट्या दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा बिबट्याला त्याचा मार्गाने जाऊ द्या, त्याला दिवसण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा,
याबाबत गावात व परिसरात वनपाल युवराज भाबड श्रीमती शितल तोरवणे, संजय बडगुजर, वनरक्षक सर्वश्री अनिल वळवी, अमोल गावित, रामदास पावरा, शिवराम गावित, अनिल पावरा, दीनानाथ कोकणी, देवमन सूर्यवंशी, तसेच स्थानिक सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ यांच्यासह गस्त केली.