*खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर जयंतीनिमित्त देवरे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर जयंतीनिमित्त देवरे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*
*खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर जयंतीनिमित्त देवरे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे थोर भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डी.डी.साळुंके,विज्ञान शिक्षक सी.व्ही. नांद्रे, यांच्या हस्ते प्रतिमा प्रतिमा पूजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ. जयंत नारळीकर यांच्या खगोलशास्त्र विषयातील "कार्य व कर्तुत्व" या विषयावर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. विज्ञान शिक्षक सी.व्ही.नांद्रे यांनी डॉ.जयंती नारळीकर यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून करून दिला. अध्यक्षीय भाषणातून डी.डी. साळुंके यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारां विषयी माहिती माहिती देऊन भारतीयांचे कर्तुत्व जगात सिद्ध झाल्याचे उदाहरणे दिलीत. विद्यालयातील वकृत्व स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एस. बेडसे व आभार एस.एच. गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक डी.बी. भारती एम. डी. नेरकर वाय.डी. बागुल, एम. एस. मराठे, व्ही.बी.अहिरे तसेच डी.बी.पाटील, एस.जी.पाटील एच. एम.खैरनार यांनी संयोजन केले.