*के. आर. पब्लिक स्कुल मधील शिशुकुंज विभागात आंतरराष्ट्रीय वाघ (इंटरनॅशनल टायगर डे) दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुल मधील शिशुकुंज विभागात आंतरराष्ट्रीय वाघ (इंटरनॅशनल टायगर डे) दिवस साजरा*
*के. आर. पब्लिक स्कुलमधील शिशुकुंज विभागात आंतरराष्ट्रीय वाघ (इंटरनॅशनल टायगर डे) दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):- श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल मधील शिशुकुंज विभागात आंतरराष्ट्रीय वाघ (इंटरनॅशनल टायगर डे) दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी प्रा. निलेश धावडे यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी केले. जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांना राहण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे तसेच शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची शिकार केल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होत आहे. प्राण्यांना वाचविणे आपले कर्तव्य आहे. या विषयावर आधारीत नृत्य, नाटक, तसेच भाषण आयोजित करण्यात आले होते. प्रा निलेश धावडे यांनी आपल्या भाषणातुन लहान चिमुकल्यांचे कौतुक केले तसेच जंगल तोड थांबली पाहिजे. वन्य प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे इत्यादी ज्ञानवर्धक गोष्टी सांगितल्या. प्राचार्या यांनी आपल्या भाषणातुन वाघाचे प्रकार किती आहेत. त्यांचे संवर्धन कसे केले पाहिजे. या विषयी माहिती दिली. शिशुकुंजच्या शिक्षकांनी परिश्रम घेत कार्यक्रम उत्तमरित्या साजरा केला. टाळयांच्या गडगडाट करीत व उत्साह वर्धक नृत्य करीत सादर करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.