*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, मुंबई उच्च न्यायालय, सर्व सर्वोच्च न्यायालयात अपिले, तपास संस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या अशा अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर 17 वर्षांनी आज, गुरुवारी जाहीर झाला. कुठलेही ठोस पुरावे नाहीत, सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा निकाल अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर 17 वर्षांनी आज, गुरुवारी जाहीर झाला.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, मुंबई उच्च न्यायालय, सर्व सर्वोच्च न्यायालयात अपिले, तपाससंस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या अशा अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर 17 वर्षांनी आज, गुरुवारी जाहीर झाला.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने काश्मीरमधून आरडीएक्स आणले आणि त्याने त्याच्या घरी बॉम्ब तयार केला याचे पुरावे आढळले नाहीत.
आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर हिच्याकडे त्या मोटारसायकलचा त्यावेळी ताबा होता, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही. तो बॉम्ब त्या मोटारसायकलमध्येच लावलेला होता, असेही निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेले नाही. याशिवाय बॉम्बस्फोट घडवण्यासाठी बैठका झाल्या ते देखील सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले.