*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कोंडतिवरे हे गाव पूर्व पट्ट्यातील दुर्गम भागात वसले आहे दोन तीन वाड्याचे हे गाव असून गावातील बहुतांश लोक नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेले आहेत या गावातील कातळवाडीतील सुपुत्र कु. अभिजित बाळकृष्ण बाणे हे बी.ए.एम.एस (BAMS) ही पदवी मिळवून डॉक्टर झाले आहेत
मुंबईतील वरळी येथील आर.ए. पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी ही डिग्री मिळवली आहे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती वडील बाळकृष्ण पांडुरंग बाणे हे अर्धांग वायू झाल्याने घरी असतात तर आई स्वाती बाणे या गृहिणी असून त्यांनी धुणीभांडी करुन त्याला शिक्षण दिले आहे परंतु जन्मजात हुशारी आणि कष्ट करण्याची तयारी याच जोरावर त्याने पदवी प्राप्त करत बाणे घराण्याचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे याआधी याच घरातील दत्ताराम बाणे यांच्या रुपाने एक गावाच्या विकासासाठी वाहून घेतलेला समाजसेवक जन्माला आला आणि आता अभिजित बाणे यांनी आपल्या काकांचा वारसा पुढे नेत डॉक्टर ही पदवी मिळवून आपल्या बाणे घराण्याचे नाव रोशन केले आहे त्यांच्या या निस्सीम यशाचे सर्वत्र कौतुक होत असून नवयुवक तरुण मित्र मंडळ (कातळवाडी) यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.