*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
मुंबई(प्रतिनिधी):-27 जुलै 2025 रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन- महाराष्ट्र राज्य आणि जागृत नागरिक सेवा संस्था- महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील कला, क्रीडा, साहित्य, संपादक, पत्रकार, कृषी, उद्योग-व्यवसाय, समाजकार्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, गायक, शासकीय, निमशासकीय इत्यादी सर्व क्षेत्रात विशेष उल्लेखनीय, भरीव काम करणाऱ्या गुणवंतांची निवड करून राज्यातील एकूण 60 पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जासई -उरण- रायगडचे सुपरिचित हरहुन्नरी कवी/लेखक/गायक/वाद्य वादक अरुण द. म्हात्रे यांची साहित्य व कला भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील- विरोधी पक्ष गटनेते विधान परिषद यांच्या शुभहस्ते अरूण द. म्हात्रे यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रकाश आबिटकर- आरोग्य मंत्री/ पालकमंत्री, जयंत आसगावकर- आमदार शिक्षक मतदार संघ, डॉ. रविकांत पाटील- चेअरमन एज्युकेशन बोर्ड पुणे, ब्रह्मकुमारी सुनंदा जी- विभागीय प्रमुख पुणे व गोवा, विशाल घोडके- सहा. कामगार आयुक्त, अनिल म्हमाने- अध्यक्ष निर्मिती मंच, विजय शिंगाडे- कामगार कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच सर्व मान्यवर- स्वागतोत्सुक अध्यक्ष सुरेश केसरकर, संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, अच्युतराव माने, श्रीकांत माजगावकर, महादेव चक्के, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, व रूपाली निकम इत्यादी कार्यकारी सदस्य उपस्थित होते. पुरस्कारार्थी आणि त्यांची मित्रमंडळी नातेवाईक, कार्यकारी सदस्य, तसेच रसिक प्रेक्षक यांनी सदर सभागृह खच्चून भरले होते. सुनियोजित आखणीने कार्यक्रम आनंदात व मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अरूण द. म्हात्रे यांचे सर्व स्तरातून कौतुकासह गौरव होत आहे.