*नंदुरबार येथे राष्ट्रीय अध्यात्म नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे 2 ऑगस्ट रोजी आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे राष्ट्रीय अध्यात्म नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे 2 ऑगस्ट रोजी आयोजन*
*नंदुरबार येथे राष्ट्रीय अध्यात्म नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे 2 ऑगस्ट रोजी आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील माझी मुलगी फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष काजल मछले यांनी आयोजित केलेल्या, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत माझी मुलगी फाउंडेशन नंदुरबार, आणि कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने, निशुल्क तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत नंदुरबार शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृह, जुने नगरपालिका या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क नेत्र तपासणी व योग्य सल्ला, मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क, शस्त्रक्रियेसाठी निशुल्क राहण्याची व्यवस्था, येण्या जाण्याची निशुल्क व्यवस्था, विदेशी लेन्स फेको व टॉपिकल फेको शस्त्रक्रिया माफक दरात, रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स सोबत आणावे, शिबिराच्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी तारीख कळविण्यात येईल, आधी तपासणी केली असल्यास उपचाराची फाईल सोबत आणावी असे आवाहन, माझी मुलगी फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक काजल मछले यांनी केले आहे.