*नंदूरबार जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळा शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित, धान्य तात्काळ पुरवठा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळा शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित, धान्य तात्काळ पुरवठा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*नंदूरबार जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळा शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित, धान्य तात्काळ पुरवठा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शैक्षणिक वर्ष 2025- 26प्रारंभ झाल्यापासून माहे जून 2025 व माहे जुलै 2025 चे शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेत तात्काळ पुरवठा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत रोज मध्यान्ह भोजन दिले जाते. नवीन शैक्षणिक वर्ष 2025- 26प्रारंभ झाल्यापासून माहे जून 2025 पासून अद्याप नंदूरबार जिल्ह्य़ातील कोणत्याच शाळेत शालेय पोषण आहाराचे धान्य प्राप्त नाही.धान्य पुरवठा न केल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांवर उसनवार धान्य उपलब्ध करून विद्यार्थांना मध्यान्ह भोजन देण्यात मोठा बोजा येत आहे. तरी शाळेत इकडून तिकडून उसनवार धान्य जमवून शाळेत मध्यान्ह भोजन सुरू आहे. शाळेतील विद्यार्थांची उपस्थिती वाढवण्यासाठी व आरोग्यासाठी शालेय पोषण आहार नियमित पणे मिळणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थांच्या आरोग्यासाठी नियमित पोषण आहारासोबतच विद्यार्थांना अंडी सारखे पोष्टीक पदार्थ आठवड्यातून एक दिवस अंडी मिळणे आवश्यक आहे. पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थांना 450 उष्मांक( कॅलरी), 12 ग्रॅम प्रथिनयुक्त (प्रथिने), तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांना 700 उष्मांक (कॅलरी), 20 प्रथिनयुक्त (प्रथिने) आहार दिला जातो. पोषण आहार योजनेंतर्गत एकुण 12 प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात हा पोषण आहार देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. यात अंडा पूलावचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या विद्यार्थांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. आर्थिक परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थांच्या आरोग्यावरसुद्धा होतो. शालेय जीवनात त्यांचा शारिरीक, मानसिक व बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांना आहारातून आवश्यक प्रथिने मिळणे आवश्यक आहेत. तसेच नियमित सकस आहार मिळणे अत्यावश्यक आहे. काही शाळेत 308 ते 400 विद्यार्थी संख्या आहे. अशा शाळेत मुख्याध्यापक उसनवारीने किती दिवस विद्यार्थांना शालेय पोषण आहारात मध्यान्ह भोजन देतील? मुख्याध्यापकांवर मोठा बोजबारा निर्माण झाला आहे. म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच शाळांत शाळा सुरू झाल्यापासून जून 2025 पासून ते माहे जुलै 2025 अखेर पर्यंत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य तात्काळ पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.