*‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका - विनोद वळवी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका - विनोद वळवी*
*‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका - विनोद वळवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर फिरणारे संदेश (मेसेज) हे निराधार आणि चुकीचे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या संदेशांमध्ये, 1 मार्च 2020 पासून ज्या मुलांचे दोन्ही किंवा एक पालक वारले आहेत आणि ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील दोन मुलांना ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने’अंतर्गत प्रत्येकी रुपये 4 हजार दरमहा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नागरिक, पत्रकार, पालक आणि समाज कार्यकर्त्यांकडून या योजनेबाबत विचारणा केली जात आहे. तथापि, महिला व बाल विकास विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना सध्या राबविली जात नाही किंवा याबाबत कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे, नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ उपलब्ध:
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार कार्यालयामार्फत 0 ते 18 वयोगटातील एकपालक बालके, अनाथ बालके, दोन्ही पालक गमावलेली बालके आणि बंदीपाल्य (कैद्यांची मुले) यासारख्या निकषांची पूर्तता करणाऱ्या बालकांना 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने'चा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत पात्र बालकांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षांपर्यंत दरमहा रुपये 2 हजार 250 अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. ज्या बालकांनी वर नमूद केलेले निकष पूर्ण केले आहेत आणि जे बाल संगोपन योजनेसाठी पात्र आहेत, अशा लाभार्थी बालकांचे पालक किंवा संबंधित व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.