*मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीची मूल्ये व तत्वे बालमनावर रुजविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविली*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीची मूल्ये व तत्वे बालमनावर रुजविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविली*
*मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीची मूल्ये व तत्वे बालमनावर रुजविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविली*
शहादा(प्रतिनिधी):-येथील मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीची मूल्ये व तत्वे बालमनावर रुजविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानाची सुरुवात संस्थेच्या प्रमुख सौ. मुक्ता मोहन पाटील व शैक्षणिक समन्वयक प्रा. डी. सी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मतमोजणीअंती राणी लक्ष्मीबाई पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. मुख्यमंत्री म्हणून प्राप्ती चौधरी यांनी शपथ घेतली. तर अन्य सदस्यांना शालेय मंत्रिमंडळाची शपथ देण्यात आली. लोकशाहीची मूल्ये व तत्वे बालमनावर रुजविण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया राबविली. त्यात निवडणूक आवेदन पत्र भरणे, निवडणूक आयोगाचे कार्य समजून घेणे, प्रचार करणे, जाहीरनामा प्रकाशित करणे व मतदान करणे या सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राबविल्या. निवडणुकीसाठी विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचे दोन पॅनल प्रत्यक्ष रिंगणात उभे होते. यात मुलांचा एक आणि मुलींचा एक असे दोन पॅनल होते. विद्यार्थ्यांनी उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. दोन दिवसांपूर्वी सूचना देऊनही काही विद्यार्थी आपले ओळखपत्र घरी विसरले होते, अश्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीअंती सर्व विजयी उमेदवार घोषित करण्यात आलेत. निवडणूक निकालात राणी लक्ष्मीबाई पॅनलला बहुमत मिळाल्याने त्यांनी शाळेच्या आवारात विजयी जल्लोष केला. या सर्व आठही विजयी सदस्यांना शालेय मंत्रिमंडळ शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले. या प्रसंगी विजयी उमेदवारांनी ढोल- ताश्याच्या गजरात मिरवणूक काढत व्यासपीठावर मंत्रिपदाची शपथ घेतली. तद्नंतर सौ. मुक्ताताई पाटील यांनी शालेय मुख्यमंत्री म्हणून प्राप्ती चौधरी हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच नवनियुक्त मंत्रिमंडळास शुभेच्छा दिल्या.
निवडणूक अधिकारी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला पाटील यांनी काम पाहिले. निवडणूक पारदर्शी पार पडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.