*DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्याने जव्हार मधील दुर्गम भागातील शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्याने जव्हार मधील दुर्गम भागातील शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप*
*DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्याने जव्हार मधील दुर्गम भागातील शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप*
डहाणू(प्रतिनिधी):-शिक्षणाचे महत्व जाणून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्याचा मानस असलेल्या टीमने जव्हार येथील डोंगर दरी खोऱ्यात असलेल्या चोंडीपाडा, आयरे, विनवळ आणि गेट पाडा या जिल्हापरिषद शाळेतील साधारण 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यामध्ये वह्या, पाट्या, पेन पेन्सिल सेट, तसेच खाऊंचा समावेश होता. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक हात पुढे सरसावले व बऱ्याच देणगीदारांनी आपापल्यापरीने मदत करत उभारलेली शैक्षणिक साहित्य वाटप मोहीम यशस्वी केली. सर्व देणगीदारांचे DVPSS च्या वतीने मनःपूर्वक आभार. हे साहित्य घेऊन वेगवेगळ्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत दुरावस्था असलेल्या रस्त्याने साधारण 10-12 किलोमीटरचा खडतर प्रवास करून इथल्या विद्यार्थ्यांना हे साहित्य पोहचवण्यात आले.
ह्यावेळी शैक्षणिक साहित्याचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून देत निसर्गाचे संतुलन टिकून रहावे, लहान मुलांमध्ये सुरुवातीपासूनच 'झाडे लावा, झाडे जगवा' ही आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने शाळांच्या आवारात दोन, दोन झाडे देखील त्यांच्या सोबत लावण्यात आली. याप्रसंगी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार, उपाध्यक्ष सतीश धर्मा गावड, साई पाटील साई पोल्ट्री फर्म, DVPSS वैतरणा स्टेशन कमीटी अध्यक्ष लक्ष्मण वैती, उपाध्यक्ष गिरीधर टोकरे, कसराळी ग्रामपंचायत माजी सरपंच संतोष भोईर, नवनीत पाटील सामाजिक सुरक्षा गवर्नमेंट अधिकारी, निलेश दळवी कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर कंपनी, जव्हार येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जितेंद्र मोरघा आणि जयेश मोरे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप मोहीम वरील जिल्हापरिषद शाळेपर्यंत गावांमध्ये पोहचून वाटप केले. या सोबत चार ही शाळांच्या शिक्षक वर्गाने देखील नियोजन पूर्वक योग्य ते सहकार्य केले.