*बिजादेवी सरपंचासह तलाठीच्या संगनमताने शेत जमिनीची परस्पर विक्री, पीडित कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिजादेवी सरपंचासह तलाठीच्या संगनमताने शेत जमिनीची परस्पर विक्री, पीडित कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव*
*बिजादेवी सरपंचासह तलाठीच्या संगनमताने शेत जमिनीची परस्पर विक्री, पीडित कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अज्ञान व निरक्षरतेचा फायदा घेत वडिलोपार्जित शेत जमीन शिवाराची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार नवापूर तालुक्यातील बिजादेवी येथे झाला. यासंदर्भात पीडित शेतकरी कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मिळणे संदर्भात निवेदन सादर केले.
याबाबत माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील बीजादेवी शिवारातील गट क्र. 13/2 येथे शेत जमीन असून सदर जमीन निलेश अमरसिंग गावित यांची वडिलोपार्जित नावावर आहे. त्यांना एकूण पाच बंधू असून याबाबत कुठलीही माहिती न कळविता शेत जमीन परस्पर विक्री केल्याचे दर्शनास आले. याबाबत निलेश गावित व कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिजादेवी येथील शेत जमीन आम्हाला न सांगता परस्पर व्यवहार करण्यात आला. सदर जमिनीचे मूळ मालक मयत माझे आई-वडील असून स्वतः निलेश गावित भावंडांच्या पालन पोषणासाठी गुजरात येथे जावे लागते. त्यामुळे सदर जमीन आई वडिलांनी गहाण पद्धतीने गावातीलच श्रीमती मोनाबाई बावा गावित यांना दिली होती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत सदर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा परस्पर विक्रीचा व्यवहार झालेला आहे. शितल किशोर पावरा या नावाच्या महिलेने परस्पर सातबारावर नाव लावून घेतले आहे. याबाबत माहिती घेतली असता सदर जमीन खोटे वारस लावून परस्पर विक्री केल्याचे समजले. बिजादेवी गावाच्या सरपंच प्रतिभा नेहरु गावित आणि तलाठी आशा पुनाजी देशमुख यांनी पीडित शेतकरी कुटुंबाच्या अज्ञानपणाचा फायदा घेत शितल किशोर पावरा आणि इंजिनियर किशोर पावरा यांना शेत जमीन परस्पर विक्रीचा व्यवहार करण्याचा प्रताप केला आहे. मुळात या शेत जमिनीचे खरे वारस निलेश अमरसिंग गावित, राकेश अमरसिंग गावित, मुकेश अमरसिंग गावित, इब्राम अमरसिंग गावित, रोहित अमरसिंग गावित तसेच मयत चंद्रसिंग गोमा गावित,स्व. मानसिंग चंद्रसिंग गावित, तारसिंग चंद्रसिंग गावित, पत्नी व मुलगी माधुरी मानसिंग गावित असे आहेत. सातबारा खरी प्रतवर वारस न लावता माझे वडीलोपार्जित जमीन किशोर पावरा यांनी पदाचा गैर उपयोग करून शेत जमीन कवडी मोल दराने विकत घेतली आहे. किशोर पावरा हे सरकारी कर्मचारी असल्याने जमीन त्यांची पत्नी शीतल किशोर पावरा यांचे नावे करण्यात आली आहे. याप्रकरणी पावरा दांपत्यासह सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून निलंबित करण्यात यावे तसेच महसूल कायद्यानुसार फसवणूक करून शेत जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पीडित शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे. या निवेदनावर निलेश गावित, राकेश गावित, मुकेश गावित, इब्राम गावित, रोहित गावित, तारसिंग गावित यांचे सही व अंगठे आहेत.