*वंजारा महिला मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वंजारा महिला मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*वंजारा महिला मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पेन्शनर हॉल या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून रनाळ्याच्या सरपंच सौ. नलिनी ओगले व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शकुंतला शिंत्रे या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत भगवान बाबांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत गीत सौ.विद्या गाभणे यांनी म्हटले. वंजारी मंडळाच्या अध्यक्षा सौ. अपर्णा पालवे पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला मंडळाच्या कार्यक्रमांची व आगामी उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात दहावी, बारावी, नवोदय, शिष्यवृत्ती,आॅलंपियाड व क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पेन भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. एकूण 35 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी आपल्या मनोगतात वंजारी महिला मंडळाच्या उपक्रमशीलतेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पालकांनीही आणि खास करून मातांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी वेळ व प्रोत्साहन द्यावे असे मार्गदर्शन केले. व भावी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. नलिनी ओगले यांनी "मुलांना प्रोत्साहन द्यावे व त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा असे आपल्या भाषणातून सांगितले". यावेळी वंजारी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशा मागील अनुभव कथन केले व काही पालकांनी महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना सांगळे व सौ. योगिता काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. ज्योती दापूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंजारी महिला मंडळाच्या कार्यकारिणी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.