*कात्री गावातील ग्रामस्थांनी नवीन वनराईला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नाव दिले, वृक्षारोपण, जलपूजनाने पर्यावरण संवर्धनाला दिली चालना*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कात्री गावातील ग्रामस्थांनी नवीन वनराईला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नाव दिले, वृक्षारोपण, जलपूजनाने पर्यावरण संवर्धनाला दिली चालना*
*कात्री गावातील ग्रामस्थांनी नवीन वनराईला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नाव दिले, वृक्षारोपण, जलपूजनाने पर्यावरण संवर्धनाला दिली चालना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील मौजे कात्री येथे दौऱ्यादरम्यान भेट दिली. या भेटीदरम्यान सामूहिक वृक्षारोपण, हाकऱ्या नदीवर जलपूजन, डिजिटल क्लासरूम व अंगणवाडी केंद्र पाहणी, तसेच आरोग्य सेवांचे परीक्षण करण्यात आले. कात्री ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून यंदा गावात 7000 पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या नव्या वनराईला कात्री ग्रामस्थांनी “जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी वनराई” असे नाव देत त्यांचा सन्मान केला. तसेच स्व. मोहन वळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, रस्त्याच्या दुतर्फा व पाटीलपाडा येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.
कात्री गावच्या खाट नदीचे बारमाही स्वरूप टिकवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी वनराई बंधाऱ्यांचा अभ्यास करून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र आणि सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्याने गावात वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. आरोग्य उपकेंद्र कात्री येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्यसेवांचा आढावा घेतला. तसेच अंगणवाडी केंद्राची पाहणी करून विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला व आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, तहसिलदार धडगाव, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रतिलाल पावरा, बांधकाम अभियंता हर्षल पटले, सरपंच संदीप वळवी, ग्रामसेवक बच्छाव, तालुका कृषी अधिकारी शिंदे, महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी ग्रामस्थांना आव्हाण केले, “पर्यावरण रक्षण, जलसंधारण आणि आरोग्य सेवा ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातूनच ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात.