*नाशिक ते व्हाया सापुतारा,सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 रस्ता जड वाहनासाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाशिक ते व्हाया सापुतारा,सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 रस्ता जड वाहनासाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन*
*नाशिक ते व्हाया सापुतारा,सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 रस्ता जड वाहनासाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन*
सुरगाणा(प्रतिनिधी):-नाशिक ते व्हाया सापुतारा, सुरत जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 9 हा जड वाहतुकीसाठी मर्यादित कालावधी करीता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे जिल्हा दंडाधिकारी शालिनी दुहान यांनी केले आहे. डांग जिल्ह्यातील सापुतारा- वघ ई रस्त्यावरील 'अंबिका नदीवरील नंदी उतारा' पूल जड वाहनांकरीता वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आला आहे. डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्गावरील साकरपातल नंदी उतारा पूल एक वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आला आहे. 12 जुलै पासून अधिसूचना प्रकाशित करून लागू करण्यात आली आहे. गुजरात राज्यात जाणे साठी सुरगाणा, उंबरठा वांसदा, धरमपूर मार्गे अवजड वाहनांना जोडणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. वडोदरा येथील गंभीरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार जागे झाले आहे. आणि राज्य सरकारने जुन्या आणि जीर्ण पुलांचा अहवाल मागवला आहे तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा, बोरगाव, नाशिक, शिर्डी जोडणारा महत्त्वाचा आंतरराज्य महामार्गावरील साकरपातल गावाजवळील नंदी उतारा पूल धोकादायक घोषित करण्यात आला आहे. हिल स्टेशनला सापुताराशी जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्ग क्रमांक एस एच 9 वरील अंबिका नदीवरील साकरपातल गावाजवळील 'नंदी उतारा' या प्रमुख पुलाच्या तपासणीनंतर मिळालेल्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार, हा पूल 'अत्यंत खराब' घोषित करण्यात आला आहे आणि एक वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांसाठी बंद घोषित करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता केतनभाई कुंकणा डांग (मा×म) विभाग (राज्य) यांच्या वघाई उपविभागाच्या अखत्यारीतील वाघई-सापुतारा रस्त्यावरील हा पूल 1959/60 दरम्यान बांधण्यात आला होता. 108 मीटर लांबीचा हा प्रमुख पूल बंद करण्यात येत आहे आणि येथून जाणारी जड व्यावसायिक वाहने डांग जिल्हा प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाने वळवली जातील (1) हातगड -सुरगाणा-उंबरठाण-बिल्धा-अवधा-धरमपूर रस्ता, आणि (2) हतगड बोरगाव -सुरगाणा-उंबरठाण- बोपी- कवडेज -वासदा रोड या रस्ता वापरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डांग जिल्हा कलेक्टर शालिनी दुहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गुजरात पोलिस कायदा-1951च्या कलम 131 अंतर्गत कोणीही याचे उल्लंघन केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. हेड कॉन्स्टेबल किंवा त्यावरील दर्जाचा कोणताही पोलिस अधिकारी आणि रस्ते आणि इमारत (राज्य) विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यासह कोणत्याही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सापुतारा या टेकडीवर येणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाच्या गाड्यांसह लहान वाहने या रस्त्याचा वापर करू शकतात हे उल्लेखनीय आहे, असे वघईचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र पटेल यांनी पूरक माहिती देताना सांगितले. फक्त हा रस्ता जड वाहनांसाठी बंद असेल अशी माहिती दिली आहे. " डांग जिल्ह्यातील राज्य महामार्ग 9 वरील पूल धोकादायक बनला असून फक्त जड वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. निसर्ग सहली करीता सापुतारा हिल स्टेशन येथे येणा-या पर्यटकांच्या कुटुंबांच्या लहान गाड्या, कार या पुलाचा वापर करु शकतात. हा पूल फक्त जड वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे असे तुकाराम कर्डीले अध्यक्ष
सापुतारा हाॅटेल असोसिएशन यांनी सांगितले आहे,
नाशिक, सापुतारा, वघई, सुरत हा राज्य महामार्ग 9 हा साखरपातळ जवळील अंबिका नदीवरील नंदी पूल धोकादायक असल्याने बंद करण्यात आला आहे. सदर वाहतूक सुरगाणा मार्गे वळविल्याने जड वाहनांची क्षमता पेलवण्याची स्ट्रेन्थ नसल्याने बोरगाव ते उबरठाण हा रस्ता पुर्णपणे उखडून जाणार आहे. आधीच या रस्त्यावर ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे निकामी होणार आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर बोरगाव ते बर्डीपाडा या राज्य महामार्गचा समावेश हायवे करीता करावा. चिंतामण गावित आदिवासी सेवक यांनी सांगितले आहे.