*माझी शाळा, माझा स्वाभिमान" उपक्रमाअंतर्गत नंदुरबार प्रकल्पातील 31 शासकीय आश्रमशाळांतील 124 प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माझी शाळा, माझा स्वाभिमान" उपक्रमाअंतर्गत नंदुरबार प्रकल्पातील 31 शासकीय आश्रमशाळांतील 124 प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण*
*माझी शाळा, माझा स्वाभिमान" उपक्रमाअंतर्गत नंदुरबार प्रकल्पातील 31 शासकीय आश्रमशाळांतील 124 प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शासकीय आश्रमशाळांमध्ये "माझी शाळा माझा स्वाभिमान" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नंदुरबार प्रकल्पातील 31 शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील एकूण 124 प्राथमिक शिक्षकांनी दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे राबवण्यात आलेल्या या कार्यशाळेचे आयोजन इंग्रजी माध्यमिक शाळा, नंदुरबार येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व सर्वस्पर्शी विकासासाठी शिक्षकांना उपयुक्त मार्गदर्शन आणि कार्यपद्धती या कार्यशाळेद्वारे दिल्या गेल्या. सदर प्रशिक्षण नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण एन. एम. साबळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, व्ही. व्ही. सोनार, पी. एम. वसावे, निर्मल माळी, डी. एन. सोनूने रवींद्र निकम, रूपाली गोसावी आदी उपस्थित होते
सुलभक म्हणून चंद्रशेखर पवार, चंद्रशेखर मानकर होते, शिक्षा मित्र इब्राम वळवी अतूल पटेल, मिनल नाईक प्रशिक्षण ठिकाणी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्यांची किट वाटप करून कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला. या उपक्रमामुळे आश्रमशाळांमधील शिक्षण पद्धतीमध्ये गुणवत्ता वृद्धिंगत होऊन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.