*तळोदा शिवसेनेतर्फे नगरपालिकेने हातावर पोट भरणाऱ्या लोकांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस संदर्भात, शिवसेनेची आव्हानात्मक बैठक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा शिवसेनेतर्फे नगरपालिकेने हातावर पोट भरणाऱ्या लोकांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस संदर्भात, शिवसेनेची आव्हानात्मक बैठक*
*तळोदा शिवसेनेतर्फे नगरपालिकेने हातावर पोट भरणाऱ्या लोकांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस संदर्भात, शिवसेनेची आव्हानात्मक बैठक*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेने हातावर पोट भरणाऱ्या लोकांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस संदर्भात शिवसेनेने आयोजित केलेल्या आव्हानात्मक बैठकीत तालुका प्रमुख अनुप उदासी यांनी सांगितलं की, पहिले ज्या लोकांची जिल्हाधिकारी यांनी सदर जागा रिकामी करण्याचे 308 चे लेखी आदेश दिले पहिले ते काढा मग आम्ही आमचे अतिक्रम बाजत गाजत काढू तरी अतिक्रमन काढण्यासाठी येणाऱ्या जेसीबी समोर शिवसैनिक सर्व्यात पुढे असणार असे सांगितले. लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कार्यालयासाठी वयक्तिक लढाई लढू शकलो असतो त्यासाठी आम्ही सक्षम आहोतच परंतु हातावर पोट भरणाऱ्या तळोद्यातील 200 लोकांनाही नगरपालिकेने बेकायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर अन्याय केला, त्याबद्दल शिवसेनेच्या ब्रीद वाक्या प्रमाणे 80% समजकारण व 20 % राजकारणच्या युक्तीप्रमाणे कधी अतिक्रमन निघेल तर आमच्यासोबत सर्व्याचेच निघेल अन्यथा कोणाचेच अतिक्रमन निघू देणार नाही, अश्या पद्धतीने उपस्थित लोकांना आश्वाशीत केले, शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी प्रस्तावना करत असताना सांगितल आम्ही आज जी बैठक बोलावली, त्याचे मुख्य कारण फक्त म्हणजे हातावर पोट भरणाऱ्या लोकांना दिलेल्या नोटीस स्थगितीसाठी जिल्हाधिकारी यांना विनंती निवेदन देऊन तसेच निवेदन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आ.चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी यांना ही निवेदन देऊन लवकरात लवकर ह्या नोटीसीना स्थगिती मिळावी ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत, यावेळी माजी बा.सभापती हितेंद्र क्षत्रिय, भट्या पाडवी, आनंद सोनार, सूरज माळी, राहूल पाडवी, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, देवेश मगरे, गणेश राणे, कल्पेश चौहान, पप्पू मराठे, नितु सोनार, क्रिष्णा पाडवी, विक्की पाटिल, युवराज चौहान, विशाल पाडवी, बादल पाडवी, कांत्या पाडवी, आकाश पाडवी, बंटी सूर्यवंशी, मनीष बत्तीसे हे सर्व उपस्थित होते.