*तळोदा ते गुजरात सीमेचा रस्ता तातडीने दुरुस्त करा–अक्कलकुवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश पाडवींची मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा ते गुजरात सीमेचा रस्ता तातडीने दुरुस्त करा–अक्कलकुवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश पाडवींची मागणी*
*तळोदा ते गुजरात सीमेचा रस्ता तातडीने दुरुस्त करा–अक्कलकुवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश पाडवींची मागणी*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तळोदा ते गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 B सध्या प्रचंड धोकादायक बनला असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. यामुळे दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत अक्कलकुवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदन देत रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. नागेश पाडवी यांनी म्हटले आहे की, "तळोदा ते गुजरात हद्दीपासून पर्यंतचा रस्ता अक्षरशः उध्वस्त झाला आहे. मोठमोठे खड्डे, खराब झालेला डांबर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अवस्था यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल." या मार्गावरून दररोज हजारो वाहने जात असून, व्यापारी व शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.