*नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय*
*नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दि. 9 जुलै 2025 रोजी नगरपरिषद कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय बैठक पार पडली. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गाव ते शहरस्तरावर प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. यावेळी
ग्रामस्तरावरील समन्वय गाव निहाय आपदा मित्र, कोतवाल आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची माहिती गुगल डॉक गृपमध्ये भरून आपत्ती काळात एकत्रितपणे सतर्क राहण्याचे निर्देश,
रस्ते व पायाभूत सुविधा करण चौफुली, धुळे चौफुली व नवापूर चौफुली येथील रस्त्यांची कामे 8 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश. साक्री नाका पुलाची दुरुस्ती एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले,
शहरातील मरीमाता मंदिर ते महिला कॉलेज व मंगळ बाजार परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले, छोट्या हॉटेल्सकडील कचरा उचलणे व घंटागाडीत कचऱ्याचे वर्गीकरण करून योग्य व्यवस्थापनाचे आदेश देण्यात आले, शहरातील बंद स्ट्रीट लाईट सुरू करणे व झाडांची छाटणी करणे, गर्दीच्या ठिकाणी विजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवणे, जुन्या धोकादायक इमारतींचे म्यापिंग करून आवश्यक ती कारवाई करणे, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी
“आपत्ती व्यवस्थापनात गाव ते जिल्हा यंत्रणांनी एकसंघ राहून प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.” असे सांगितले.