*श्रीमती. विमातालाई बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविध्यालय प्रथमोपचार CPR विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती. विमातालाई बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविध्यालय प्रथमोपचार CPR विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन*
*श्रीमती. विमातालाई बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविध्यालय प्रथमोपचार CPR विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालया संस्थेच्या माजी चेअरमन स्व. विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ नर्सिंग महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला सदर कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे संचालक ऍडव्होकेट राम चंद्रकांत रघुवंशी व यशवर्धन मनोज रघुवंशी, समन्वय एम एस रघुवंशी, प्रभारी प्राचार्य भूषण ठोंबरे, आदी उपस्थित होते दोन दिवशीय कार्यशाळेसाठी 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्थेचे नर्सिंग महाविद्यालय तज्ञ शिक्षकांद्वारे प्रभोपचार विषयावर नर्सिंग लॅबमध्ये प्रात्यक्षिक दिले जाणार असून CPR या विषयावर हृदयरोग तज्ञ डॉक्टर रोशन भंडारी हे दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना CPR चे प्रत्यक्ष ट्रेनिंग देतील व मार्गदर्शनाद्वारे रुग्णांचे प्राण कशाप्रकारे वाचवू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील महाविद्यालयातील शिक्षक भूषण वळवी, अंजली वळवी, मधुर वळवी, सोनल गावित, वंदना वळवी, शंकर वसावे इत्यादी दुपारच्या सत्रात प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व CPR प्राध्यक्षकरित्या सराव करून घेणार आहेत
कार्यशाळेच्या उद्घाटन सोळ्यास संस्थेचे संचालक एडवोकेट राम रघुवंशी यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले व सदरील कार्यशाळेचे महत्त्व व CPR याविषयी समाजामध्ये जागरूकता असण्याची गरज असल्याचे सांगितले व रुग्णसेवेस मध्ये परिचारीकांचे महत्त्व अधोरेखित केले सदरील कार्यशाळेचे सूत्रसंचालक ग्रंथपाल प्रमेश वसावे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका योगिनी सपकाळे यांनी केले सदरील कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक धोबी, आकाश शिंदे, विवेक मराठे व कल्पना पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.