*नंदुरबार येथील पि के पाटील माध्यमिक विद्यालयात एक पेड माॅं के नाम या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील पि के पाटील माध्यमिक विद्यालयात एक पेड माॅं के नाम या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण*
*नंदुरबार येथील पि के पाटील माध्यमिक विद्यालयात एक पेड माॅं के नाम या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित, सहकार महर्षी पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे 8 जुलै रोजी संस्थेचे संचालक बलवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे निरज चौधरी सहाय्यक निबंध प्रशासन जिल्हा उपनिबंध यांच्या शुभहस्ते तसेच योगेश जाधव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी व किरण त्रिवेदी, माध्यमिक विभागाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक अनिल चौधरी या प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हरित सेनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी आजपर्यंत शाळेने संगोपन केलेल्या विविध झाडांची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माॅं के नाम' या संकल्पनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती प्रत्येकाने आपापल्या अंगणात आईच्या नावाने एक झाड लावून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे आवाहन केले. तद्नंतर प्रमुख मान्यवरांचा परिचय व सत्कार बेलाचे रोप देऊन करण्यात आला. नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निरज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती तसेच विविध वृक्षांची माहिती देत मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षिय भाषणात बलवंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शेतात, अंगणात, कॉलनी परिसरात असे विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन हरित सेनेचे प्रमुख विश्वास गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार तर समारोप अमोल भदाणे यांनी केला, याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक श्रीमती चेतना चौधरी, सुधाकर सूर्यवंशी, श्रीमती उज्वला चौरे, नितीन साळी, डी.डी.वळवी, एल. आर.अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकूर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.