*विकसित महाराष्ट्र- 2047' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकसित महाराष्ट्र- 2047' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन*
*विकसित महाराष्ट्र- 2047' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्य शासनाने 100 दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक 6 मे 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @2047’ करिता 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. 'विकसित महाराष्ट्र- 2047' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्यांनी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे केले. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे - महाराष्ट्र @ 2047, मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @ 75 व अल्पकालीन उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. ‘विकसित महाराष्ट्र -2047’ च्या 'व्हिजन डॉक्युमेंट' चा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय 16 गट स्थापन करण्यात आले आहेत. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र- 2047’च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण दि. 18 जून,2025 ते 17 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येत आहे. विधानसभेतील सर्व सदस्यांनी आपल्या समाजमाध्यमांद्वारे, मेळावे, बैठकांमध्ये ‘विकसित महाराष्ट्र - 2047’ च्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे. तसेच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्युआर कोड व लिंक वरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल. सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन ‘विकसित महाराष्ट्र 2047’ बाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.