*नंदुरबार शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खडयात झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करणेबाबत तिव्र आंदोलन करण्यात येणार पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खडयात झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करणेबाबत तिव्र आंदोलन करण्यात येणार पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
*नंदुरबार शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खडयात झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करणेबाबत तिव्र आंदोलन करण्यात येणार पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खडयात झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करणे बाबत तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी यांना आज देण्यात आले. याबाबत तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा शिवसेना उबाठा पक्षामार्फत महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिला आहे.
याबाबत पालिकेचे प्रशासन अधिकारी जयसिंग गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, महानगर प्रमुख पंडित माळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष घारू कोळी, उपशहर प्रमुख खंडू माळी, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, उपशहर प्रमुख एजाज काजी, माजी सैनिक कमलेश वाघ, शहर संघटक भक्तवत्सल सोनार यांच्या सह्या आहेत. नंदुरबार शहरातील सर्व रस्ते हे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे नंदुरबार शहरात ठिकठिकाणी मोठ मोठे खडे पडल्यामुळे दररोज कोठेना कोठे अपघात होत असतांत आता पाणी पावसाळयाचे दिवस असल्यामुळे त्या खंडयात पाणी भरल्यामुळे कोणालाही रस्ता कळत नाही त्यामुळे अपघात होत असतात तसेच नंदुरबार शहराची ड्रेनेज लाईन कोठे ना कोठे चॉकप असल्यामुळे त्याचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत आहे. ते चॉकप काढण्यासाठी सुध्दा रस्ता खोदकाम करण्यात येत असुन तेथे सुध्दा मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे सुध्दा वारंवार ड्रेनेज लाईन तुटून त्याचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत असते. सद्या पाणी पावसाळयाचे दिसत असल्यामुळे व वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे व पडक्या इमारती यांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्या सर्व अडथळा ठरणाऱ्या पडक्या इमारती व झाडे झुडेपे कापुण रस्ता सुरळीत करावा तसेच नंदुरबार शहरातील स्ट्रीट लाईट पथदिवे काही ठिकाणी चालु तर पुष्कळ ठिकाणी बंद असतात त्यामुळे तेथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते तेथे चोरी व अपघात होण्याची सुध्दा दाट शक्यता असते. तसेच नंदुरबार शहरात सर्व धर्मियांची उत्सवाचे दिवस सुरु झालेले आहेत त्यामुळे सुध्दा रस्ता सुरळीत करावा. आता नंदुरबार शहरात शाळा महाविद्यालय सुध्दा सुरु होतील व रस्त्यावर वर्दळ वाढेल सर्व विद्यार्थी हे रिक्षा, ॲपेरिक्षा, व्हॅन किंवा खागजी वाहनाने शाळेत येण्या -जाण्यासाठी प्रवास करतात त्यावेळेस रस्त्यातील ड्रेनेज लाईनचे खड्डे किंवा रस्त्यावरील पडलेले मोठ मोठे खड्डे यात काही अपघात झाल्यास विद्यार्थ्याचे व सामान्य नागरिकांचे काही कमी जास्त झाल्यास त्यास प्रशासन नगर पालिका स्वताः जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी.
तसेच नंदुरबार शहरातील श्री दादा गणपती व श्री बाबा गणपती यांचा मिरवणुकी मार्गावरील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारा मार्ग म्हणजे सोनार खुंटपासुन ते साक्री नाक्यापर्यंत या रस्त्यावर सुध्दा मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे तो रस्ता सुध्दा सुरळीत करण्यात यावा व त्यारस्त्यवरील सर्व खड्डे बुजविण्यात यावे व रस्ता सुरळीत करण्यता यावा. येत्या 15 दिवसात रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज लाईनचे खड्डे, स्ट्रीट लाईट, झाडे झुडपे, पडक्या इमारती यांचा योग्य रितीने उपाय योजना करण्यात यावी जर आपण हि उपाययोजना केली नाही तर शिवसेना टाईल्सने तिव्र आंदोलन नगर पालिके समोर केले जाईल त्याच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जवाबदारी आपल्या प्रशासनाची राहिल याची नोंद घ्यावी. असे निवेदन आम्ही आपणास वरिल संदर्भान्वये देण्यात आले होते परंतु प्रशासनाने आजतागायत कोणत्याही प्रकारचे खड्डे बुजविण्याचे काम सुरु केलेले नसुन पाणी पावसळयात अजुन खड्डयांना तळ्याचे स्वरुप प्राप्त होत आहे व त्यात दिवसेंदिवस घटनांमध्ये वाढ होत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे मार्फत दिनांक 11 जुलै 2025 ते दिनांक 17 जुलै 2025 रोजी पर्यंत सकाळी 11 वाजता विविध रस्त्यांवर व नंदुरबार शहरातीच्या नगर पालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवर पडलेल्या खंड्डयांमध्ये झाडे लावण्याचा सप्ताह सुरु करण्यात येणार आहे तसेच शेवटच्या दिवशी नगर पालिकेला तालाठोक आंदोलन तिव्र स्वरुपात करण्यात येणार आहे.