*श्रीमती चंद्रबेन रामदास बाल मंदिर येथे, आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात आषाढी वारी सोहळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती चंद्रबेन रामदास बाल मंदिर येथे, आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात आषाढी वारी सोहळा संपन्न*
*श्रीमती चंद्रबेन रामदास बाल मंदिर येथे, आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात आषाढी वारी सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):–सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती चंद्रबेन रामदास बाल मंदिर येथे आज, मंगळवार दिनांक 8 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात आषाढी वारी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी बालमंदिरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रखुमाईच्या वेशात साकारलेली वारकरी वेशभूषा आणि फुगड्यांतील सामूहिक सहभाग हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हातात भगवे झेंडे, टाळ- मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली" च्या जयघोषात निघालेल्या या बालवारकऱ्यांनी वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती आणि परंपरेची सुंदर झलक साकारली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूनमगिरी, प्रा. डॉ. युवराज पाटील, मुख्याध्यापिका सौ. भदाणे, पालक सौ. दिपाली बागुल व सौ. कविता लाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षकवृंद व सर्व पालक यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेचे श्रेय सर्व शिक्षक, पालकवर्ग आणि उत्साहाने सहभागी झालेल्या चिमुकल्या बालचमूंना दिले जात आहे. वारकऱ्यांच्या पावलांशी नातं जोडणारा आणि संस्कारांची गोडी लावणारा हा उपक्रम बालकांच्या मनात नक्कीच अधोरेखित झाला.