*उमापती महादेव मंदिर परिसरात लाईट व स्वच्छतेसाठी नंदुरबार नगरपरिषदेला निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उमापती महादेव मंदिर परिसरात लाईट व स्वच्छतेसाठी नंदुरबार नगरपरिषदेला निवेदन*
*उमापती महादेव मंदिर परिसरात लाईट व स्वच्छतेसाठी नंदुरबार नगरपरिषदेला निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी): -नंदुरबार शहरातील दसरा मैदानाजवळील श्री उमापती महादेव मंदिर, श्री उघडेश्वर महादेव मंदिर व श्री मोठानंदी मंदिर या परिसरात लाईट व स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नंदुरबार नगरपरिषदेला देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रावण महिन्यात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी या परिसरात येतात. मंदिराच्या परिसरात महिलांचा, मुलांचा व वृद्धांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. तथापि, मंदिर परिसर व पायवाटेतील स्वच्छतेचा अभाव असून रस्त्यावर साचलेल्या घाणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यावरील लाईटची व्यवस्था (स्ट्रीट लाईट्स) देखील निकृष्ट अवस्थेत असून भाविकांना रात्रीच्या वेळेस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी व लाईट दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोहन मनम मराठे यांच्यासह स्थानिक नागरीकांनी स्वाक्षरी करून सादर केले असून, त्यात प्रमोद नाना माळी, करुणाकर मोरे, राजेंद्र तांबोळी, किशोर अहिरे, विक्रांत भानुदास मराठे, तसदीक शेख, विवेक भानुदास मराठे यांच्यासह इतरांची नावे समाविष्ट आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.