*भारतीय डाक विभागाच्या विमा प्रतिनिधी पदासाठी थेट मुलाखत-हरी प्रसाद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय डाक विभागाच्या विमा प्रतिनिधी पदासाठी थेट मुलाखत-हरी प्रसाद*
*भारतीय डाक विभागाच्या विमा प्रतिनिधी पदासाठी थेट मुलाखत-हरी प्रसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय डाक विभागाच्या धुळे विभागाने टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींच्या नेमणुका थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) कमिशन तत्वावर भरण्यात येणार असल्याची, माहिती धुळे डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक हरी प्रसाद यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
पात्रता आणि अटी:
वयोमर्यादा, उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान 10 वी पास/मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. अनुभव इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे आवश्यक आहे.
कोण अर्ज करू शकतो, बेरोजगार तरुण-तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबंधित दस्तावेज सोबत जोडून प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे यांच्या कार्यालयात दिनांक 18 जुलै, 2025 पूर्वी प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे जमा करावेत. अर्ज केलेल्या आणि अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविण्यात येईल.
विमा प्रतिनिधीच्या निवडीबाबतचे आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्याकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा असेही आवाहन प्रवर अधिक्षक प्रसाद यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.