*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे 9 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे 9 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे 9 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मध्यवर्ती संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात 9 जुलै 2025 रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने सदर संपाला पाठिंबा देत अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार असून खालील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेविकांना तृतीय श्रेणी आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणी लागू करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि दरमहा सेवानिवृत्ती वेतन लागू करावे. THR वाटपासाठी FRS आणि आहार वाटपासाठीची आधार जोडणी रद्द करावी. FRS मधील तांत्रिक अडचणी (फोटो कॅपचर) दूर करून सेविकांना दैनंदिन होणारा त्रास थांबवावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 15-15 दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4 ऐवजी सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम केलेल्या सेविका मदतनीसांना थकीत मेहताना देण्यात यावा. सेविका मदतनीसांना त्यांच्या सेवा काळात महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली करण्यात यावी. सेविकांच्या रिक्त पदांवर पात्र आणि अनुभवी मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी. मुख्यसेविकांच्या पदावर सेविकांना पदोन्नती देण्यासाठीचे निकष (10 वी उत्तीर्ण आणि वय 55 वर्षे) पूर्वीप्रमाणेच ठेवावे.
यासह अन्य मागण्या मंजूर कराव्यात. यासाठी 9 जुलै 2025 रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस एक दिवसाचा लक्षणिक संप करणार असल्याची नोटीस संघटनेने मुख्यमंत्री, मंत्री आणि सचिव महिला व बालविकास, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांना देण्यात आली आहे. तरी धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सेविका मदतनीसांनी संपाच्या दिवशी अंगणवाडी केंद्र बंद ठेवावे आणि पोषण ट्रॅकरसह कोणतेही दैनंदिन कामकाज न करता शंभर टक्के संप यशस्वी करावा. असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण बी. पाटील, अमोल बैसाणे, राजू पाटील, वकील पाटील यांनी केले आहे.